नवउदारमतवादाचा डांगोरा जरा जास्तच पिटला गेला आहे का?
खाजगीकरण-उदारीकरण-जागतिकीकरण (खा-ऊ-जा)ने संपूर्ण जगाचा इतिहास बदलला व भौगोलिक सीमारेषा पुसून टाकल्या. नवउदारमतवादी अजेंडा स्वीकारून जगातील सर्व देशांनी एकाच पद्धतीने व एकाच दिशेने विकास साधला पाहिजे असा आग्रह धरणारे धुरीण आता ह्या अजेंड्याचा पुनर्विचार करून समुचित तेचस्वीकारण्याचा सल्ला देऊ लागले आहेत. आय एम एफ ह्या शीर्षस्थ संस्थेतील तीन अतिशय ज्येष्ठ तज्ज्ञांनी विकासाच्या महामार्गाचा केलेला हा पुनर्विचारतुम्हाला …